मराठी विभागाविषयी
‘ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार’ हे ब्रिद उराशी बाळगून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक, संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी उच्च शिक्षणाची व्दारे मराठवाडयाच्या प्रवेशव्दारी बालाघाटाच्या डोंगर रांगावर वसलेल्या तुळजापूर तिर्थक्षेत्री या महाविद्यालयाची स्थापना सन 1971 साली केली. दि.15 जून 1971 पासून महाविद्यालयामध्ये मराठी विभाग सुरु झाला. विभागाच्या प्रारंभापासूनच आपल्या ज्ञानकेंद्री भूमिकेमूळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अग्रस्थान ठेवण्यात हा विभाग यशस्वी झाला आहे. या विभागातील विद्यार्थी आपल्या कल्पक व उपक्रमशील आणि बुध्दिवादी भूमिकेमुळे विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. यामुळेच शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात या विभागाने नेत्रदीपक असा ठसा उमटविला आहे. मराठी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणे, स्वत:च्या पायावर उभे करणे, त्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविणे या करिता विभागामार्फत अनेक उपक्रम राबविले जातात. विभागातील विद्यार्थी बौध्दिक संपन्न व्हावा, त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण व्हावा, स्वतंत्र प्रवृत्ती जोपासली जावी, व्यक्तीगत जीवनात ताठ मानेने त्यांना उभे रहाता यावे. या गोष्टीकडे विभागाचे अधिक लक्ष असते. विद्यार्थ्यांच्या सद्गुणांना उत्तेजन देणे हे आमचे प्रथम कर्तव्य समजतो. याकरिता मूल्यांची जपणूक करण्याकडे विभागाचा अधिक कटाक्ष असतो. ज्ञानाधारित व तंत्रज्ञानाधिष्टीत युगाची आव्हाणे पेलणारा, क्रीयाशील, सृजनशील व लोकशाही मूल्यांवर निष्ठा ठेवणारा उत्तम नागरिक घडविण्याकरिता विभागामार्फत अनेक उपक्रम राबविले जातात. वक्तृत्त्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रमांतून असे सुसंस्कारित विद्यार्थी बनविणे हेच उदिष्ट समोर ठेऊन आज अखेर अनेक नाट्य कलांवंत, चित्रपट दिग्दर्शक, सिनेअभिनेते, लेखक, कवी, पत्रकार, शिक्षक, समाजसेवक, राजकीय नेते अशा विविध क्षेत्रात या विभागातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केलेले आहे. याचा सार्थ अभिमान वाटतो.

Departmental Staff

Prof. Dr. Rama Bhimrao Kokade

Faculty Member

Prof. Kamble Sohan Milind

Faculty Member

दृष्टी

भाषा आणि साहित्याचे अध्ययन-संशोधन.

ध्येय

1. मराठी विषयाच्या अभ्यासक्रमातून पर्यावरण संवर्धन, स्त्री-पुरुष समानता, स्वातंत्र्य, समता, बंधूता, न्याय आणि प्रेम या मानवी मूल्यांचा आविष्कार करणे.
2. स्त्री सबलीकरण, स्त्री भ्रूण हत्या, धार्मिक स्वातंत्र्य, मानवी हक्क ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे, विद्यार्थी स्वावलंबी बनावा यासाठी त्यास जागरुकपणे विविध कौशल्य आत्मसात करुन देणे. तो सुसंस्कृत, आचारशील, विचारशील व कर्तृत्त्वसंपन होण्याचा प्रयत्न करणे.
3. कला, विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या विकासाचे श्रेय हे साहित्याचेच आहे. संस्कृतिचा वारसा एका पिढीकडून दुस-या पिढीकडे संक्रमित करण्याचे कार्य भाषेमुळे होते. व्यक्तीमत्त्व विकासात भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणून प्रगल्भ अशी भाषा बोलणारा उत्तम, सुजान नागरिक निर्माण करणे.
4. आपल्या कुवतीनुसार साहित्याच्या क्षेत्रामध्ये नैपूण्य प्राप्त करुन देऊन व्यक्तीमत्त्व विकासात भर घालणे.
5. विद्यार्थ्यांच्या वाड्.मयीन अभिरुचित वाढ करुन सामाजिक बांधिलकी, मानवता, नितीमत्ता, लोकशाही, औद्योगिकता, नियोजन यांचे सजग भान निर्माण करुन देणे.
6. भाषिक कौशल्ये आणि संप्रेषण कौशल्यांचा विकास करत अन्यायाला वाचा फोडत लोकशिक्षण व समाजप्रबोधन, स्वभान व आत्मभान निर्माण करणे.

उद्दिष्टये

1. वाचन व लेखन कौशल्याचा विकास करुन या अभ्यासक्रमाव्दारे विद्यार्थ्यांचे भावनिक, मानसिक व बौध्दिक पातळीवर व्यक्तीमत्त्व समृध्द करणे.
2. भाषा कौशल्याचा विकास करुन नवनिर्मितीस प्रवृत्त करणे. समीक्षात्मक व संशोधनात्मक दृष्ट्या विकास करणे.
3. कलाकृतीचा परिचय करुन देऊन पर्यावरण, मानवी मूल्यसंस्कार व सांस्कृतिकता यांचा परिचय करुन देणे.
4. प्राचीन, शिवकालीन व पेशवेकालीन सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक स्थतीगती लक्षात घेता त्या काळातील ग्रंथ रचनेचा परिचय व ग्रंथ विशेष यांचे आकलन करुन देणे.
5. भाषा, बोलीचे शब्दविशेष नोंदविणे.
6. मराठी वाड्.मयाच्या इतिहासाच्या अनुषंगाने त्या-त्या काळातील सामाजिक चळवळींचा साहित्यावरील प्रभावाचा अभ्यास करणे.
7. दृकश्राव्य माध्यमांसाठी लेखनकौशल्ये आत्मसात करणे.
8. माध्यमलेखनात असणारे साहित्याचे महत्त्व विषद करणे.
9. मराठीचे अध्ययन करण्यासाठी, विद्यार्थ्यांना साहित्यातील विविध प्रवाह व प्रकार लक्षात आणून देणे.
10. साहित्य अभ्यासातून जीवन जगण्याची कला विकसित करणे. समाजाकडे डोळसपणे पाहता येण्याची कला विकसित करणे. याकरिता व्यवहार विज्ञान, कार्यालयीन व वाङ्मयीन परिभाषेचे आकलन करुन देणे. माहिती तंत्रज्ञानाचा परिचय करुन देणे.

B. A.
ClassSubjectIntake CapacitySyllabus
B. A. IMarathi120View
B. A. IIMarathi120View
B. A.IIIMarathi120View
B. A.Com
ClassSubjectIntake CapacitySyllabus
B. Com. IMarathi120View
B. Com IIMarathi120View
Short Term & Value added courses
Value Added Courses

Short Term Courses
YearClassPapersResult
2017-2018B.A. I (SL)Opt. Paper I81.39%
2017-2018B.A. I(SL)Opt. Paper II67.34%
2017-2018B.A. II (Opt)Opt.Paper III61.53%
2017-2018B.A. II(Opt.)Opt. Paper IV92.10%
2017-2018B.A. III(Opt.)Opt. Paper V99%
2017-2018B.A. III(Opt.)Opt. Paper VI100%
2017-2018B.A.III(Opt.)Opt. Paper VII100%
2017-2018B.A. III(Opt.)Opt. Paper VIII100%
2017-2018B.Com I(SL)83.36%
2017-2018B.Com II(SL)100%
YearClassPapersResult
2018-2019B.A. I (SL)Opt. Paper I100%
2018-2019B.A. I(SL)Opt. Paper II100%
2018-2019B.A. II (Opt)Opt.Paper III77.27%
2018-2019B.A. II(Opt.)Opt. Paper IV99%
2018-2019B.A. III(Opt.)Opt. Paper V100%
2018-2019B.A. III(Opt.)Opt. Paper VI100%
2018-2019B.A.III(Opt.)Opt. Paper VII100%
2017-2018B.A. III(Opt.)Opt. Paper VIII100%
2018-2019B.Com I(SL)83.36%
2018-2019B.Com II(SL)100%

Head of Department

Departmental Video Gallery